मागणीची लवचिकता म्हणजे काय?


प्रा. मार्शल यांच्या मते, "ज्याप्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घडते यालाच मागणीची लवचिकता म्हणतात." दुसऱ्या शब्दात, किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात.

मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.

मागणीच्या लवचिकतेचे पुढीलप्रमाणे प्रकार आहेत.

1) उत्पन्न लवचिकता:

व्यक्तीच्या उत्पन्नातील बदल याचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलांच्या संबंध आला उत्पन्ना लवचिकता असे म्हणतात. यामध्ये उत्पन्न व्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे अन्य घटक स्थिर असतात.

मा. उ. ल.=मागणीतील शेकडा बदल/उत्पन्नातील शेकडा बदल

2) छेदक लवचिकता:

छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य (पर्यायी व पूरक) वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल होय.

मा. छे. ल.= अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बद्दल/ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बद्दल

3) किंमत लवचिकता:

वस्तुच्या किमतीतील प्रमाणित बदलांमुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात.

मा. कि. ल.= मागणीतील शेकडा बदल/किमतीतील शेकडा बदल.

मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.

मागणीच्या किंमत लवचिकतेचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात.

1) अनंत संपूर्ण लवचिक मागणी (Ed=∞):

किमतीत अल्प किंवा मुळीच न बदल होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्यास अनंत लवचिक मागणी असे म्हणतात.

मा. कि. ल.= मागणीतील शेकडा बदल/किमतीतील शेकडा बदल

2) संपूर्ण अलवचिक मागणी (Ed=0):

किमती मध्ये कितीही शेकडा बदल झाला, तरी मागणीत कोणताच बदल होत नाही त्याच संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात.

मा. कि. ल.= मागणीतील शेकडा बदल /  किमतीतील शेकडा बदल.
 0% / 20 % = 0

3) एकक लवचिक मागणी (Ed=1):

किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणे इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात.
मा. कि. ल.= मागणीतील शेकडा बद्दल /  किमतीतील शेकडा बदल.

4) जास्त लवचिक मागणी (Ed>1):

किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात.

5) कमी लवचिक मागणी (Ed<1):

जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते व त्यात कमी लवचिक मागणी असे म्हणतात.

मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक सांगा.

मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक पुढील प्रमाणे आहेत.

1) वस्तु स्वरूप:

वस्तूच्या स्वरूपानुसार जीवनावश्यक वस्तू, सुखसोयी च्या वस्तू, आणि चैनीच्या वस्तू असे वर्गीकरण केले जाते. जीवनावश्यक वस्तू ची मागणी अलवचिक असते तर सुखसोयी व चैनीच्या वस्तूंची मागणी लवचिक असते.

2) पर्यायी वस्तूंची उपलब्धता:

जेव्हा वस्तूला बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात अशा वस्तूंची मागणी सर्वसाधारणपणे लवचिक असते. याउलट पर्याय उपलब्ध नसेल तर अशा वस्तूंची मागणी अलवचिक असते.

3) वस्तूचे अनेक उपयोग:

एकाच उपयोगासाठी असणाऱ्या वस्तूंची किंमत लवचिकता कमी लवचिक असते, तर विविध उपयोगी वस्तूंची मागणी जास्त लवचिक असतो.

4) व्यसनाच्या वस्तू:

सवयीच्या वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदाहरणात दारू, गुटखा, इ.

5) टिकाऊपणा:

टीकाऊ वस्तूची मागणी जास्त लवचिक असते तर नाशवंत वस्तूची मागणी अलवचिक असते.

6) पूरक वस्तू:

पूरक वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ पेट्रोलची किंमत कमी झाली तर टू व्हीलर ची मागणी वाढते.

7) उपभोक्त्याचे उत्पन्न:

उपभोक्त्याची उत्पन्न पातळी उच्च असेल तर मागणी अलवचिक असते आणि उत्पन्न कमि असेल तर लवचिक असते.

8) गरजेची तीव्रता:

ज्या वस्तूची गरज अति तिव्र असते त्या वस्तूची मागणी अलवचिक असते. तसेच या वस्तूची गरज कमी तीव्र असते त्या वस्तूची मागणी जास्त लवचिक असते.

9) कालावधी:

कालावधी जेवढा अधिक तेवढी मागणीची किंमत लवचिकता अधिक असते आणि कालावधी कमी तेवढी मागणीची किंमत लवचिकता कमी असते.

मागणीच्या किंमत लवचिकतेचे मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा.


1) गुणोत्तर / शेकडेवारी किंवा प्रमाणित पद्धत:

या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किंमतीतील शेकडा बदलांनी भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते.

मा. ल.= मा.% ∆\ कि. % ∆

2) एकूण खर्च पद्धत:

मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदलेल्या किमतीला होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय.

3) बिंदू किंवा भूमिती पद्धत:

या पद्धतीमध्ये सूत्र च्या साह्याने मागणी व करा वरील बिंदूची लवचिकता मोजता येते. रेषीय मागणी वक्र व रेखीय मागणी वक्र याद्वारे विविध सूत्राच्या साह्याने मागणीची किंमत लवचिकता मोजली जाते.