उपयोगिता विश्लेषण | घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत


उपयोगिता विश्लेषण | घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत

प्रश्न 1ला: उपयोगिता म्हणजे काय उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

उत्तर:-
उपयोगिता म्हणजे वस्तू मध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता होय.
उपयोगितेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.

  • 1) सापेक्ष संकल्पना:-

उपयोगिता ही स्थल व काल सापेक्ष संकल्पना आहे. ती स्थळ परत्वे व कालपरत्वे बदलत असते. उदाहरणार्थ, हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांमध्ये जास्‍त उपयोगिता जाणवते.

  • 2) व्यक्तिनिष्ठ संकल्पना:-

उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना असून ती व्यक्तीनुसार बदलत असते. कारण व्यक्तीची आवडी-निवडी, प्राधान्य, स्वभाव, पसंती, इत्यादींमध्ये फरक असतो.

  • 3) नैतिक दृष्ट्या तटस्थ:-

उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो. वस्तू चांगले-वाईट, योग्य-अयोग्य असा कोणताही विचार न करता व्यक्तीची गरज पूर्ण करीत असते. उदाहरणार्थ चाकुर चा उपयोग फडे कापण्यासाठी व दुसऱ्याला इजा पोहोचवण्यासाठी सुद्धा होतो.

  • 4) उपयोगिता व उपयुक्तता यात फरक आहे:-

उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता होय, तर उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपभोग मूल्य होय. उदाहरणार्थ, उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तता ही जाणवते. मात्र व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते पण उपयुक्तता जाणवत नाही.
  • 5) उपयोगिता व आनंद यात फरक आहे:-
वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळतोच असे नाही. उदाहरणार्थ, आजारी व्यक्तीला इंजेक्शन मध्ये उपयोगिता असते, पण त्यापासून त्याला आनंद मिळत नाही.

  • 6) उपयोगिता व समाधान यात फरक आहे:-

उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे तर समाधान हे उपयोगाचा परिणाम आहे. उदाहरणार्थ तहानलेली व्यक्ती एक ग्लास पाणी पिते कारण पाण्यामध्ये तहान भागविण्याची क्षमता असते. पाण्यामधील उपयोगिता हे उपयोगाचे कारण आहे आणि मिळालेले समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे.

  • 7) उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य:

उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना असून ती अदृश्य मूर्त संकल्पना आहे. त्यामुळे संख्यात्मक किंवा आकडेवारीत मापन करणे शक्य नाही. उपयोगिता फक्त अनुभवता येते आणि ती धनात्मक, शून्य व ऋणात्मक जाणवते. ऋणात्मक उपयोगीतेला नकारात्मक उपयोगिता असे म्हणतात.

  • 8) उपयोगिता बहुपर्यायी आहे:

एक वस्तू एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागवते तसेच ती वस्तू विविध वापरासाठी उपयोगी ठरते. उदाहरणार्थ, विजेचा वापर.

  • 9) उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते:

वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जेवढी गरजेची तीव्रता जास्त तेवढी उपयुक्तता अधिक जाणवते. उदाहरणार्थ, भुकेलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये भूक नसलेल्या व्यक्ती पेक्षा जास्त उपयोगिता जाणवते.

  • 10) उपयोगिता मागणीचा आधार:

वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच व्यक्ती त्या वस्तूची मागणी करेल. उदाहरणार्थ, आजारी व्यक्तीला औषधांमध्ये उपयोगिता जाणवते.

प्रश्न 2रा: उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा.

  • 1) रूप उपयोगिता:
जेव्हा वस्तूचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्याची उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ मातीपासून खेळणी बनवणे.
  • 2) स्थल उपयोगिता:
जेव्हा वस्तूचे स्थळ बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते तेव्हा त्या स्थळ उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ, नदीतील रेती कन्स्ट्रक्शन साईट वर आणून निर्माण होणारी उपयोगिता.

  • 3) सेवा उपयोगिता:

जी उपयोगिता सेवेच्या स्वरूपात पुरवली जाते तिला सेवा उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ, डॉक्टर, वकील, शिक्षक, गायक, इत्यादी.

  • 4) ज्ञान उपयोगिता:

वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करून निर्माण होणाऱ्या उपयोगीतेस ज्ञान उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ, मोबाईल फोन व संगणकामुळे निर्माण झालेली उपयोगिता.

  • 5) स्वामित्व उपयोगिता:

वस्तूंची मालकी हस्तांतरणाने निर्माण होणारी उपयोगी ते स्वामित्व प्रेरित असे म्हणतात. उदाहरणार्थ, विक्रेत्यांकडून ग्राहकाकडे वस्तू हस्तांतरित होणे.

  • 6) काल उपयोगिता:

काळ बदलल्याने वस्तूमध्ये निर्माण होणाऱ्या उपयोगितेस काल उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ, रक्तपेढी.

प्रश्न 3 रा: घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा.

उत्तर:

  • प्रस्तावना

प्रा. अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित केलेल्या "अर्थशास्त्राची मूलतत्वे" या ग्रंथात घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे तो पुढीलप्रमाणे.

  • नियम:

प्रा. अल्फ्रेड मार्शल यांच्या मते "इतर परिस्थिती स्थिर असता व्यक्ती जवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ केल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते."

  • गृहीतके:
  • 1) विवेकशीलता:
उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे तसेच तो महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो असे गृहीत धरले आहे.

  • 2) संख्यात्मक मापन:

उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे गृहीत धरले आहे.

  • 3) एकजिनसीपणा:

उपयोगातील वस्तूचे सर्व नग आकार स्वरूप रंग वेस्टन इत्यादी बाबत समान असावेत असे गृहीत धरले आहे.

  • 4) उपभोग सातत्य:

एखाद्या वस्तूचे सर्व नागांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एकापाठोपाठ घेतला पाहिजे असे गृहीत धरले आहे.
  • 5) योग्य आकारमान:
उपभोग्य वस्तूच्या सर्व नद्यांचे आकारमान योग्य किंवा साधारण असावे त्या अत्यंत मोठे किंवा लहान असू नये असे गृहीत धरले आहे.

  • 6) आवडीनिवडी कायम:

उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी, आवडीनिवडी, यासारखे घटक स्थिर असावेत असे गृहीत धरले आहे.

  • 7) विभाज्यता:

उपयोगात आणलेल्या वस्तूचे लहानात लहान तुकड्यांमध्ये विभाजन करता येते असे गृहीत धरले आहे.

  • 8) एकच गरज:

एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे सिद्धांतात गृहीत धरले आहे.

utility
 घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत



  • आकृती द्वारे स्पष्टीकरण


वरील आकृतीत 'क्ष' अक्षावर वस्तूचे नग दर्शवले आहेत तर 'य' अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शवली आहे. व्यक्तीने पहिल्यांदा पाहिलं नग सेवन केले असता त्याला 10 इतकी उपयोगिता मिळाली. तसेच नंतरच्या नागापासून क्रमशा 8, 6, 4, 2, अशी उपयोगीता क्रमशा घटत जाऊन ती सहाव्या नगावर शून्य आणि सातव्या नगावर (ऋण) -2 अशी दिसून आली.
"सीउ" हा वक्र 'क्ष' अक्षाला स्पर्श करतो तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते व कमाल समाधानाची पातळी दर्शविते. यावरून असे स्पष्ट होते की, व्यक्तीच्या उपभोगामध्ये सातत्याने जसजशी वाढ होत जाते तस-तशी त्या वस्तु पासून मिळणारी उपयोगिता कमी कमी होत जाते. म्हणून, सीमांत उपयोगिता वक्र हा वरून खाली उतरणारा असतो.
(सीमांत उपयोगिता वक्र वरून खाली उतरणारा असतो. सहमत आहात की नाही ते लिहा.)

  • सिद्धांताचे अपवाद

  • 1) छंद:

दुर्मिळ नाणी व चित्रे यांचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकाचे वाचन करणे, इत्यादी सारख्या शब्दाबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही.

  • 2) कंजूष व्यक्ति:

कंजूस उपयोग त्याच्याबाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वेळी नागापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळते कारण की तो लोभी असतो.

  • 3) व्यसन:

मध्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखी वाटते.

  • 4) सत्ता:

व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होत जाते तसतशी सच्ची सत्तेची लालसा वाढत जाते व तो अधिकाधिक सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतो.
  • 5) पैसा:
पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही. तसेच पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता ही वाढत जाते. कारण विविध गरजा भागवताना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी पैसा वापरला जातो.
  • मूल्यमापन:
वरील विवेचनावरून असे सिद्ध होते की व्यक्तीच्या जवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यामध्ये जसजशी वाढ होत जाते तस-तशी त्या वस्तू पासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशा घटक जाते.



0 Comentarios

if you have any doubts, please lets me know.

Follow Me On Instagram