सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये, व्याप्ती, व महत्त्व वर्ग बारावी करिता
![]() |
| सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र |
सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये, व्याप्ती, व महत्त्व वर्ग बारावी करिता
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हा शब्द ग्रीक भाषेतील 'मायक्रोस' या शब्दापासून घेतलेला आहे याचा अर्थ 'लहानात लहान' किंवा 'एक दशलक्षावा भाग' असा होतो.
समग्रलक्षी अर्थशास्त्र हा शब्द ग्रीक भाषेतील 'मॅक्रोस' या शब्दापासून घेतलेला आहे याचा अर्थ 'मोठ्यात मोठा' किंवा 'समग्र' असा होतो.
सर रॅगनर फ्रिश यांनी 1933 मध्ये अर्थशास्त्राचे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र अशा दोन भागात विभाजन केले.
प्रा. मार्शल यांनी 1890 मध्ये 'अर्थशास्त्राची मूलतत्वे' हा ग्रंथ प्रकाशित केला.
अर्थशास्त्राचे जनक ऍडम स्मिथ यांनी 'राष्ट्राची संपत्ती' हा ग्रंथ 1776 मध्ये प्रकाशित केला.
लॉर्ड केन्स यांनी 'पैसा व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत' हे पुस्तक 1936 मध्ये प्रकाशित केले.
(रिकाम्या जागा भरा मध्ये नेहमी विचारतात.)
प्रश्न 1ला: सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय ते सांगून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर:-
मॉरीस डाॅब यांच्या मते 'अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय.'
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
- वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास:
(सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करते. सकारण लिहा.)
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान विभागात विभाजन करून विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब, किमती, इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करीत असते.
- किंमत सिद्धांत
(सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणून सुद्धा ओळखले जाते. सहमत आहात किंवा नाही ते लिहा)
सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किमती, आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याविषयीच्या सिद्धांतांचा अभ्यास करते.
- अंशिक समतोल
(सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. सहमत आहात किंवा नाही ते लिहा.)
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र अंशिक समतोल यामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण करते. उदाहरणार्थ, वस्तूची किंमत ही मागणी व पुरवठा यांच्या समतोलावरून कशी ठरते याचे विश्लेषण करते.
- विशिष्ट गृहीतकांवर आधारित
(सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे सिद्धांत विशिष्ट गृहीतकांवर आधारित असतात. सकारण लिहा)
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय सिद्धांताची 'इतर परिस्थिती कायम असता' या मुलभूत गृहीतकाने विवेचनाची सुरुवात केली जाते. उदाहरणार्थ, व्यक्तीच्या आवडीनिवडी कायम, उत्पन्न कायम, इत्यादी गृहीतकांवर आधारित असते.
- विभाजन पद्धत
(सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात पद्धतीचा वापर केला जातो. सहमत आहात किंवा नाही ते लिहा.)
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन करून प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे व तपशीलवार अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक मागणी, इत्यादी.
- सीमांत तत्वाचा वापर
सीमांत परिमाण म्हणजे एका वाढवू नका यामुळे एकूण प्रमाणात होणारा बदल होय याचा वापर उत्पादक व उपभोक्ता त्यांचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो.
- बाजार रचनेचे विश्लेषण
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार, इत्यादी बाजार रचनांचे विश्लेषण करते.
- मर्यादित व्याप्ती
(सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. सहमत आहात की नाही ते लिहा.)
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती वैयक्तिक घटकांत पुरतीच मर्यादित आहे. ती तेजी-मंदी, राष्ट्रीय उत्पन्न, इत्यादी सारख्या समग्रलक्षी संबंधित नाही.
प्रश्न 2रा: सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा.
(सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. सहमत आहात की नाही ते लिहा.)
उत्तर:-
- अ) वस्तूची किंमत निश्चिती सिद्धांत:-
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास होत असतो. यामध्ये वैयक्तिक वस्तूंच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात.
- ब) उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत:-
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात उत्पादन घटकांना मिळणारा मोबदला जसे भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज, आणि संयोजकाला नफा यांना मिळणाऱ्या मोबदल्याची निश्चिती करण्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र मदत करते.
- क) आर्थिक कल्याणाचे सिद्धांत:-
आर्थिक कल्याणाचा संबंध साधनसामग्रीचा कार्यक्षम वाटपाचे असून यापासून संपूर्ण समाजाला महत्तम समाधान कसे प्राप्त होईल या आर्थिक कार्यक्षमता चा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करीत असते.
प्रश्न 3रा: सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट करा.
- 1) किंमत निर्धारण:
विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते.
- 2) मुक्त बाजार अर्थव्यवस्था:
सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. म्हणजेच वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे, इत्यादी सारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात.
- 3) विदेशी व्यापार:
सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तुवरील परिणाम, दोन देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे इत्यादी विदेशी व्यापारातील विविध पैलूंची स्पष्टीकरण करते.
- 4) आर्थिक प्रारूपांची निर्मिती:
सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारुपांद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करत असते. उदाहरणार्थ, विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यात योगदान करीत असते.
- 5) व्यावसायिक निर्णय:
व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यवसायात निर्णय घेण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र सिद्धांत मदत करते. यामध्ये त्पादन खर्चाची निश्चिती, किंमत निश्चिती, उत्पादन व नफा इत्यादींचा समावेश होतो.
- 6) शासनास उपयुक्त:
सरकारी कर धोरण सार्वजनिक खर्च धोरण किंमत पुराण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते.
- 7) कल्याणकारी अर्थशास्त्र चा आधार:
सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते.
प्रश्न 4था : समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय? स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर:-
- स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या:
प्रा. जे एल हॅन्सेन यांच्या मते "स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार एकूण बचत एकूण गुंतवणूक राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समस्यांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो."
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये:
- 1) समग्र घटकांचा अभ्यास:-
स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समग्र चलांचा अभ्यास करते. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, इत्यादी.
- 2) उत्पन्न सिद्धांत:
(समग्रलक्षी अर्थशास्त्र उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. सहमत आहात की नाही ते लिहा.)
स्थूल अर्थशास्त्र समग्र आर्थिक चलांचा अभ्यास करत असून त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापण पद्धती, आणि सामाजिक लेखांकनांचा अभ्यास करते. तसेच एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्नातील चढ-उतार, व्यापार चक्रातील तेजी-मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते.
- 3) सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण:
(स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण करते. सहमत आहात की नाही ते लिहा.)
स्थूल अर्थशास्त्र समग्र आर्थिक घटकांच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीची संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किमती यांच्याशी निगडित आहे.
- 4) परस्परावलंबन:
स्थूल विश्लेषणात एकूण उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमतपातळी, इत्यादी सारख्या समग्र आर्थिक चलांचे परस्परांवलंबन लक्षात घेतले जाते.
- 5) राशी पद्धत:
(स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धतीचा अवलंब केला जातो. सहमत आहात की नाही ते लिहा.)
राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, राशी पद्धतीमध्ये वैयक्तिक मागणीचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणीचा विचार केला जाते.
- 6) वृद्धीची प्रारूपे:
स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग व त्यासाठी आवश्यक प्रारूपे विकसित करते.
- 7) सर्वसाधारण किंमत पातळी:
(समग्रलक्षी अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी चा अभ्यास केला जातो. सहमत आहात की नाही ते लिहा.)
सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतींची सरासरी होय. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास केला जातो.
- 8) धोरणाभिमुख:
स्थूल अर्थशास्त्र आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणाची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ, भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, इत्यादी.
प्रश्न 5: स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा.
उत्तर:
- 1) उत्पन्न व रोजगार सिद्धांत:
(स्थूल अर्थशास्त्र याला उत्पन्न व रोजगार सिद्धांत असे म्हणतात. सहमत आहात की नाही ते लिहा.)
स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न उत्पादन बेरोजगार पातळीतील बदल याची कारणे स्पष्ट करते. त्याचप्रमाणे रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते, उपभोग फलन व गुंतवणूक फलन यांच्या सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करते.
- 2) सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत:
(समग्रलक्षी अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी चा अभ्यास करत असते. सहमत आहात की नाही ते लिहा)
स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ-उताराची कारणांचे विश्लेषण करते. त्यामुळे तेजी-मंदी सामान्य पातळी मुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते.
- 3) आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत:
स्थूल अर्थशास्त्र विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधी सिद्धांतांचा समावेश करतो. त्यात अल्प विकास आणि दारिद्र्य यांची कारणे कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते.
- 4) विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत:
स्थूल अर्थशास्त्र सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडित आहे.

0 Comentarios
if you have any doubts, please lets me know.